अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

रत्नागिरी  (जिमाका) : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि आगामी वर्षातही अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यातील उपलब्ध जलसाठ्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राज्यातील प्रत्येक धरणातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रमुख तरतुदी आणि पाणी वापराचा प्राधान्यक्रम

 * पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त १०% आपत्कालीन बफर साठा:

राज्यातील सर्व प्रमुख धरणे व तलावांमधील पाणी आरक्षित करताना बाष्पीभवन, गाळ आणि अनधिकृत उपसा गृहीत धरून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन केले जाईल. याव्यतिरिक्त, अनपेक्षित परिस्थिती व कोरडा दुष्काळ लक्षात घेता प्रत्येक प्रमुख प्रकल्पात १० टक्के जिवंत पाणीसाठा अतिरिक्त आपत्कालीन/बफर साठा म्हणून राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिवंत साठा संपल्यास तांत्रिक व्यवहार्यता तपासून मृत साठ्यातील (Dead Storage) पाण्याचा उपसा केला जाईल.

* शहरे व गावांमध्ये पाणीकपात आणि पुनर्वापर:

सर्व महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींना पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १०% पाणीकपात लागू होईल आणि परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी ही कपात वाढवू शकतील. तसेच, प्रक्रिया केलेले सांडपाणीच उद्याने, बांधकामे, रस्ते धुलाई आणि औद्योगिक वापरासाठी वापरणे बंधनकारक राहील.

* उद्योगांना ३०% पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक:

औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापरावरही निर्बंध लादण्यात आले असून, प्रत्येक उद्योगाने आपल्या एकूण वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर (Recycle/Reuse) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 * शेती व सिंचनासाठी अटी व शर्ती:

पिण्याचे पाणी, जनावरांची गरज, उद्योग आणि चारा/बियाणे प्रकल्पांची गरज भागवून पाणी शिल्लक राहिल्यासच रब्बी हंगामातील कमी पाणी लागणाऱ्या व चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरच बारमाही पिकांचा विचार केला जाणार आहे.

पाणीचोरीविरोधात संयुक्त मोहीम व कडक कारवाई

धरणे, नद्या आणि कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त भरारी पथक नियमित गस्त घालणार आहे. अनधिकृत मोटारी, पाइपलाइन आणि पंप तात्काळ जप्त करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा संनियंत्रण समिती‘

एकापेक्षा जास्त जिल्ह्यांशी संबंधित धरणांचे नियोजन जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील ‘कालवा सल्लागार समिती’ करेल. तर जिल्ह्यातील इतर मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या पाणी नियोजनासाठी संबंधित पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मनपा आयुक्त, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी सदस्य असतील, तर अधीक्षक अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

राज्यातील संभाव्य तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कडक पावले उचलली असून, नागरिकांनी व शेतकरी बांधवांनीही पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 128 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले