विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील दिवटेवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अजित वसंत शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून, रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

​मिळालेल्या माहितीनुसार, अजित शिंदे हे अचानक फिट येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

​उपचार सुरू असताना, अजित शिंदे यांच्या तोंडातून आणि उलट्यातून येणाऱ्या उग्र वासावरून त्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्यायल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. नातेवाईकांनी तातडीने घरी जाऊन शोध घेतला असता, घराच्या बाजूला एक विषारी औषधाची रिकामी बाटली आढळून आली. ही बाटली डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्या दिशेने उपचार सुरू करण्यात आले.

​डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विष पसरल्याने उपचाराला यश आले नाही. अखेर १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे डॉ. आकाश यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

​या घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजित शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राजापूर आणि रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 89 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले