नर्सरीमध्ये काम करताना सर्पदंश; ३० वर्षीय महिलेचा मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे नर्सरीमध्ये काम करत असताना सापाने दंश केल्यामुळे एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री जितेंद्र बजे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून या घटनेमुळे पालवणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयश्री बजे या २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास पालवणी येथील सोनल सुधाकर आंबीये यांच्या नर्सरीमध्ये नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास नर्सरीतील काम करत असताना त्यांना एका पिवळसर रंगाच्या सापाने दंश केला.

सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना ‘मृत’ घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २९ जानेवारी २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. बी.एन.एस.एस.कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मयत जयश्री बजे या लाटवण, जांभुळनगर (पोस्ट-पालवणी) येथील रहिवासी होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 89 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले