[ मुंबई | ३१ जानेवारी २०२६ ]
➡️ महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज नवा अध्याय लिहिला गेला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारा हा शपथविधी साध्या वातावरणात पार पडला.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. कुटुंबीयांवरील दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत बारामतीतच मुक्काम करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
महिलांना राजकारणात नेतृत्वाच्या सर्वोच्च पातळीवर स्थान मिळवून देणारा हा क्षण मानला जात असून, सुनेत्रा पवार यांच्या शपथग्रहणाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचा मान मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.







