घंटा चोरीप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

रत्नागिरी:- रत्नागिरीसह रायगड जिल्हयातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या राकेश तुळशीराम पडवकर (लोणावळा), जगलाल केवट (उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल) यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक किलो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. चोरीप्रकरणात आणखी काहींच्या सहभागाचा पोलिसांना संशय असून पथके त्यांच्या मागावर आहेत.

तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिराची पितळी घंटा चोरीप्रकरणाचा येथील पोलिसांनी छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी केली आहे. तिघांच्या अटकेने आतापर्यंत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. अटकेतील राकेश पडवकर आणि जगलाल केवट हे दोघे अट्टल चोरटे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या दोघांनी मंदिरातून चोरलेल्या धातूच्या पितळी घंटा व अन्य ऐवज हिरालाल गंगारामजी कुम्हार याने घेतल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. आणखी ऐवज पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. आणखी काहींचा सहभाग असण्याच्या शक्यतेने पथकाने तपास गतीमान केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांचा समावेश आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 128 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले