मिशन लक्षवेध जिल्हा स्तरावरील ॲथलेटिक्स क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणी

रत्नागिरी  ( जिमाका) :- राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसीत होण्याच्या दृष्टीने मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरीता सद्यस्थितीत ॲथलेटिक्स या खेळांकरीता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील केंद्र हे अनिवासी केंद्र आहे. जिल्हास्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता एस. व्ही. जे. सी. टी. क्रिडा संकुल, डेरवण, सावर्डे, ता. चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/१FAlpQLSelLZpEpNKZSHvAoZ-६TX१xcgwf_७x-qfmB_A९_Z२aWlaPbSJw/viewform?usp=header या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, क्रीडा कामगिरी (शुटींग, टेबल टेनिस या खेळाचे राज्य/राष्ट्रीय स्तरावरील रँकींग) याबाबतची मूळ कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे.

जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या प्रवेशाकरिता चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित केला असून दिनांक 9एप्रिल रोजी वर नमूद ठिकाणी आवश्यक साहित्यासह उपस्थित रहावे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंना निवड चाचणीकरिता वर नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वरील संबंधित खेळातील अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंनी सदर निवड चाचणीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 130 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले