रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती ! भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

रत्नागिरी (जिमाका)- कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाकरिता उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मर्या. (MADC) यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न होणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील टी.आर.पी. परिसरातील ‘हॉटेल सावंत पॅलेस हॉल’ येथे आयोजित करण्यात आला आहे.

​        या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पालकमंत्री तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबतच गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

​या कार्यक्रमाला ​लोकसभा सदस्य नारायण राणे, सुनिल तटकरे, ​विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, ​विधानसभा सदस्य शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, ​प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल , मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

​     विमानतळाच्या या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म.वि.वि.कंपनी मर्यादितचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 128 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले