कृषी विभागामार्फत ‘रानभाजी’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य’ पाककला स्पर्धा १४ आॕगस्ट रोजी

रत्नागिरी  (जिमाका)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६ साठी ‘रानभाजी पाककला स्पर्धा’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महिलांना व पाककला प्रेमींना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. ही स्पर्धा १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत येथील विवेक हॉटेल – देसाई बँक्वेट हॉल येथे पार पडेल.

निशुल्क सहभाग: या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

सहभागाची अट: एका स्पर्धकाला एका वेळी एकाच (रानभाजी किंवा पौष्टिक तृणधान्य) स्पर्धेत भाग घेता येईल.

* रानभाजी पाककृतीमध्ये मुख्य घटक ‘रानभाजी’ असणे अनिवार्य आहे.

* पौष्टिक तृणधान्य पाककृतीमध्ये मुख्य घटक बाजरी, नाचणी, वरी, राळा, हरिक यांसारखे ‘तृणधान्य’ असणे आवश्यक आहे.

* पदार्थ आणि सजावट: स्पर्धकांनी पदार्थ घरूनच बनवून आणावा. सजावटीचे साहित्य स्वतः आणावे व सजावट पूर्णपणे खाण्यायोग्य घटकांचीच असावी.

* पाककृतीची माहिती: बनवलेल्या पदार्थाची संपूर्ण कृती आणि त्याचे पौष्टिक गुणधर्म A4 साईज कागदावर लिहून पदार्थासोबत ठेवणे बंधनकारक आहे.

* वेळेचे बंधन: स्पर्धकांनी आपल्या पदार्थांची मांडणी सकाळी ९ ते १० या वेळेतच करणे आवश्यक आहे. सकाळी १० नंतर येणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.

नोंदणी आणि महत्त्वाची माहिती:

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर, पौष्टिक तृणधान्य स्पर्धेसाठी पहिल्या ३० तर रानभाजी स्पर्धेसाठी पहिल्या ४० स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना आयोजकांमार्फत आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

 

नाव नोंदणीसाठी संपर्क:

* श्रीमती हर्षला पाटील – 9422441571

* श्रीमती नेहा पवार – 9423203641

* श्रीमती गौरी शेरे – 9403144581

अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 130 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 16 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले