रत्नागिरी जिल्हृयात घरोघरी गणरायाचे आगमन

रत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत चेहरे अशा मंगलमय वातावरणात गणेशचतुर्र्थीपूर्वीच हरतालीका तृतीयेला गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाणे पसंत केले. गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेशभक्तांनी रविवारीच अगदी वाजत-गाजत बाप्पाची मूर्ती घरी आणली, सोमवारी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात १ लाख ६० हजार ठिकाणी खासगी आणि ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच गणेशभक्तांनी गणेशाची मूर्ती घरी नेणे पसंत केले. मागील काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी अगदी पारंपारीक पध्दतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पा घरोघरी नेण्यात आले. गणेशाच्या पूजेकरीता आवश्यक साहीत्य खरेदीकरीतादेखील गणेशभक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. किरकोळ वर्दळ असणारी रत्नागिरी बाजारपेठ मात्र या दोन दिवसांपासून गणेशभक्तांच्या गर्दीने फुलुन गेली होती. बाप्पाच्या पूजेकरीता आवश्यक धूप, कापूर, उदबत्ती, फुले, तोरणमाळ, सजावटीचे सामान घेण्यासाठी गणेशभक्त बाजारपेठेत दाखल झाले होते. शहरातील राम आळी गणेशभक्तांनी फुलुन गेली होती.
जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ ठिकाणी खासगी आणि ११० सार्वजनिक बाप्पांच्या मूर्तीची सोमवारी प्रतिष्ठापना होणार आहे. रत्नाागिरी शहरामध्ये ७,९११ घरगुती तर २६ सार्वजनिक गणेशोत्सवांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ९ हजार ४३९ घरगुती व केवळ एक सार्वजनिक, जयगड परिसरात २८०१ घरगुती तर ६ सार्वजनिक, संगमेश्वर १३,५६४ घरगुती तर १ सार्वजनिक, राजापूर १९,९०० घरगुती तर ६ सार्वजनिक, नाटे ७,३६५ घरगुती तर २ सार्वजनिक, लांजा १३,५४० घरगुती तर ६ सार्वजनिक, देवरूख १२,४९३ घरगुती तर ७ सार्वजनिक, सावर्डे १०,२४० घरगुती तर २ सार्वजनिक, चिपळूण १६,४६४ घरगुती तर १३ सार्वजनिक, गुहागर १४,४६० घरगुती तर २ सार्वजनिक, अलोरे ५ हजार ६५० घरगुती तर ३ सार्वजनिक, खेड १३,७२५ घरगुती तर १७ सार्वजनिक, दापोली ६३३६ घरगुती तर ९ सार्वजनिक, मंडणगड ४,३८९ घरगुती तर ६ सार्वजनिक, बाणकोटमध्ये ७६० घरगुती तर २ सार्वजनिक, पूर्णगडमध्ये ५,६७५ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार ८७५ खासगी तर एका ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना होणार आहे.

 

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 130 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 38 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 39 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 34 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले