इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षिततेने वापर करावा – माहिती व तंत्रज्ञान मंत्री. ॲड.आशिष शेलार • मंत्रालयात ‘सेफर इंटरनेट डे’कार्यक्रम साजरा

मुंबई  : नागरिकांनी डिजिटल व्यसनापासून दूर राहून, इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षित वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य , माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे मंत्रालयात आयोजित ‘सेफर इंटरनेट डे’ कार्यक्रमात ते  बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक भुवनेश्वरी एस, राज्य सूचना विज्ञान अधिकारी सपना कपूर, चेन्नई तील तज्ज्ञ  श्रावण शेट्टी, भरत राजगोपालन आणि मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, त्याचा अतिरेक टाळून तो मर्यादित आणि सुजाणपणे वापरणे आवश्यक आहे. भारताच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देखील डिजिटल व्यसनाधीनतेचा धोका अधोरेखित करण्यात आला असून, त्यामुळे व्यक्तीची उत्पादकता आणि निर्णयक्षमता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

युवकांमध्ये डिजिटल व्यसन वाढल्यास, त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रगतीवर होऊ शकतो. इंटरनेट वापराचे प्रमाण, त्याची मर्यादा, सुरक्षितता, नैतिकता आणि जबाबदारी या सर्व बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जसे आपण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करतो, तसेच आता इंटरनेट वापरासंबंधी ‘सेफ इंटरनेट चेकअप’ करणे काळाची गरज आहे. ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकाने या बाबतीत सजग राहून, सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व जोपासावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे डिजिटल सुरक्षेविषयी अत्यंत जागरूक असून, महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहा –  मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आपल्या दैनंदिन कामासाठी आपल्याला डिजिटल साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र हे करत असताना अधिक सजग राहणे आवश्यक  असल्याचे  मुख्य सचिव  राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

मोबाईलवर नेहमी पिन लॉक ठेवणे, अनावश्यक ठिकाणी फ्री वायफाय नेटवर्कचा वापर टाळावा, ई-ऑफिस दस्तऐवज किंवा पासवर्ड इतरांना देणे टाळावे, गुगलवर मिळणारे फसवे बँक हेल्पलाइन नंबर वापरू नयेत, अधिकृत वेबसाइटवरूनच संपर्क साधावा, अशी सूचनाही मुख्य सचिव अग्रवाल यांनी यावेळी केली.

वेगवेगळ्या डिजिटल प्रणालीचा वापर करताना सोपे पासवर्ड ठेवू नये याऐवजी मोठा आणि व्हिज्युअल पासवर्ड सुरक्षित असतात. तसेच सोशल मीडियावर अति शेअरिंग टाळून शांत जीवन जगा, असे आवाहनही मुख्य सचिव अग्रवाल यांनी केले.

स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवड — कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

Related Posts

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी व स्पर्धा परीक्षा केंद्राची होणार उभारणी सन २०२५-२६ मधील संपूर्ण ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता साहित्य…

जिद्दीचे दुसरे नाव श्वेता…

एखादी गोष्ट ठरवणे आणि प्रत्यक्षात ती उतरवणे यामध्ये प्रचंड अंतर असते. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या एखादी गोष्ट ठरवतात आणि त्याप्रमाणे मेहनतपूर्वक ती प्रत्यक्षात  आणतात. अशीच एक गुणी,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 89 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले