एखादी गोष्ट ठरवणे आणि प्रत्यक्षात ती उतरवणे यामध्ये प्रचंड अंतर असते. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या एखादी गोष्ट ठरवतात आणि त्याप्रमाणे मेहनतपूर्वक ती प्रत्यक्षात आणतात. अशीच एक गुणी, जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मुलगी म्हणजे रत्नागिरीची श्वेता प्रदीप सुर्वे होय. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, असलेल्या सामान्य परिस्थितीतून मार्ग काढत आज लंडनमध्ये एका प्रथितयश कंपनीत वरच्या हुद्द्यावर काम करत आहे. रत्नागिरीसारख्या दुर्गम आणि पायाभूत शिक्षणाच्या बेताच्या सुविधा असलेल्या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका मुलींने अशा ठिकाणी काम करणे हे केवळ रत्नागिरीतच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीला आदर्शवत असे उदाहरण आणि प्रेरणा आहे. पुणे येथील VIT इंजिनिअरिंग कॉलेजमधून Instrumentation मध्ये BE Degree घेतल्यानंतर तिचे Campus interview मध्ये Tata Honeywell Company, Pune येथे सिलेक्शन झाले. इथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर तिच्यावर प्रमोशन संदर्भात या कंपनीकडून झालेला अन्याय तिला सहन न झाल्याने तिने ती नोकरी तात्काळ सोडली आणि Oil and Gas मध्ये London येथील Royal Gordan University येथे MBA करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती London मध्ये जाण्याच्या तयारीत असताना रत्नागिरीमध्ये तिला एका आपत्तीला सामोरे जावे लागले. यामध्ये तिच्या पायाच्या गुडघ्याला गंभीर ईजा झाली आणि तिचा एक पाय एक महिन्यासाठी प्लास्टरमध्ये टाकला गेला. असे असतानाही तिने न डगमगता तिच्या बरोबरचे भारतातून एकत्रित जाणारे विद्यार्थी लंडनमध्ये जाऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली असतानासुद्धा पंधरा दिवस उशिराने तिने त्या सरळ व ताट ठेवण्याच्या स्थितीतील पायाच्या अवस्थेमध्ये विमानातून एकटीने प्रवास करून London येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करवून घेतली आणि ती लंडन येथे पंधरा दिवस उशिराने तिच्या अभ्यासासाठी दाखल झाली. तिथे दाखल झाल्यानंतर Walker च्या साह्याने जिन्यांची चढ उतार करत मागील पंधरा दिवसांचा अभ्यास भरून काढत तिने Merit मध्ये MBA Degree Pass केली. भारतातील Tata Honeywell, Pune या कंपनीने तिच्या प्रमोशन मध्ये केलेल्या अन्यायाविरुद्ध London Honeywell कंपनीमध्ये रुजू होउन तिने पुन्हा एकदा आपल्या क्षमता सिद्ध करून दाखवल्या. या काळामध्ये भारतामधील हैदराबाद येथील लंडनस्थित एका कार्तिक नुकाला या ब्राह्मण इंजिनियर मुलाकडून तिला विवाहाबाबत विचारणा झाली असता तिने त्याला तिच्या आई-वडिलांकडे रत्नागिरी येथे संपर्क साधण्यास सांगितले. तिची आणि तिच्या आई वडिलांची या मुलांबाबतची पसंती झाल्याने ती त्याच्याशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिच्या पतीराजांची नोकरी चीनमध्ये असल्याने त्यांचेसोबत राहण्यासाठी London येथे असणारी नोकरी सोडून ती चीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी दाखल झाली आणि त्या देशात नोकरीसाठी आवश्यक असणारी चिनी भाषा शिकण्याची सुरुवात केली. पण दुर्दैवाने त्यावेळी चीनमध्ये मध्ये सुरू झालेला कोरोना आणि या दांपत्याची असणारी ब्रिटिश सिटीजनशिप लक्षात घेऊन लंडन गव्हर्मेंटने त्यांना लंडनमध्ये नेले. लंडन येथे काही काळ नोकरी नसलेल्या अवस्थेत काढल्यानंतर तिने नेदरलँड्स येथे व शेवटचा काही भाग स्पेन या देशात शिक्षणासाठी राहून Renewable Energy मध्ये MBA करण्याचा निर्णय घेतला आणि ते शिक्षण कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्ण करून ती आज लंडन येथील Orsted या एका मोठ्या कंपनीमध्ये वरच्या हुद्यावर कार्यरत आहे.
आज तिच्या 40 व्या वाढदिवशी या तिच्या धाडसी व निशचयी जीवनप्रवासाचे स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. तिच्या पाठीशी कायम असणारे तिथे आई वडील आणि तिचे मामा आणि तिला कायम साथ देणारा पती कारथिक यांच्या मिळणाऱ्या भक्कम पाठिंबाचा तिने परिपूर्ण फायदा उठविला. परिस्थितीची असणारी जाणीव, नातेवाईकांप्रति व तिच्याशी आणि तिच्या नातेवाईकाशी संबंधित यांच्या प्रति असणारे प्रेम, आदर आणि आपलेपणा या गोष्टीतून ती एक प्रामाणिक, मनमिळावू आणि परस्पर संबंध जपणारी असल्याचे सर्वांच्याच लक्षात येईल. तिला 40 व्या वाढदिवशी तिला आणि तिचे पती कार्तिक नुकाला यांना त्यांचे उर्वरित जीवन असेच भरभराटीचे, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जावो अशा सदिच्छांसह मनःपूर्वक शुभेच्छा.💐







