रत्नागिरी : रत्नागिरीच्या मांडवी येथील माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मांडवी परिसरासह राजकीय, सामाजिक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
मृदू, प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.







