रत्नागिरी : राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी राज्यभर धरणे सत्याग्रह करण्यात आला रत्नागिरी समन्वय समितीच्या वतीने मा. ना. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी समन्वय समिती रत्नागिरी निमंत्रक श्री चंद्रकांत चौघुले, कार्याध्यक्ष श्री दिनेश सिनकर,मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोहिते, मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष मांजरेकर, मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी श्री.अजित पिलणकर आणि तसेच धरणे सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन पाठिंबा देणारी रत्नागिरी तालुका हमाल पंचायत रत्नागिरीचे पदाधिकारी त्यांच्या मागण्याचे निवेदन देण्याकरिता उपस्थित होते.







