विजयदूर्ग येथील सागरी जलतरण स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : विजयदुर्ग येथील खाडीत 9 वी सरखेल कान्होजी आंग्रे खुली जलतरण स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग आयोजित या स्पर्धेचे नियोजन कोल्हापूरच्या जिम स्विमिंग अकॅडमीने केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील 110 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत रत्नागिरीच्या अवघ्या 4 वर्षांच्या इजहान कापडे याने 500 मीटर अंतर पार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात आदेश जाधव (रत्नागिरी), हर्षवर्धन कर्लेकर (बेळगाव), अर्णव पिलणकर (रत्नागिरी), शौर्या राऊत (रत्नागिरी), वरून राज डोंगळे (कोल्हापूर), आदित्य बर्गे, भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), करण मिलके (रत्नागिरी), राजू कलकुटगी (कोल्हापूर) आणि श्रीमंत गायकवाड (सातारा) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात अद्विका गौडा (कर्नाटक), दूर्वा चव्हाण (कोल्हापूर), वैष्णवी शिरोडकर (गोवा), कृष्णा हार्व्याशी (कोल्हापूर), राजनंदिनी तिवले (कोल्हापूर), चैत्राली नवले (सातारा), तनया मिलके (रत्नागिरी), समिधा मोरे (ठाणे), गौरी मिलके (रत्नागिरी) आणि गायत्री फडके (पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धा ही 5 किलोमिटर, 3 किलोमिटर, 2 किलोमिटर, 1 किलोमिटर व 500 मिटर या प्रमाणे व विविध गटात घेण्यात आली होती. रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये  त्या त्या  गटात जलतरणपटूंनी आपली चमक दाखवून  विविध पारितोषिके मिळविली. महेश मिलके स्वीमिंग ग्रुपच्या पुढील स्पर्धकांनी प्रथम क्रमांक- करण मिलके,तनया मिलके, सौ. गौरी मिलके,  अर्णव पिलणकर, शौर्य राऊत, आदेश जाधव,द्वितीय क्रमांक -अजित पिलणकर, अल्फराज कापडे, सान्वी पवार, तृतीय क्रमांक – आरोही पिलणकर , निधी भिडे, चतुर्थ क्रमांक – आयुष काळे,विहान दळवी,पाचवा क्रमांक – योगेंद्र तावडे,आयुष कटाळे,सहावा क्रमांक – रितेश हर्चेकर, इझान कापडे, सिध्दांत सूर्यगंध यांनी पटकावले. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविलेल्या स्पर्धाकांना रोख बक्षिसही देण्यात आले. त्याचबरोबर सन्मान चिन्ह व मेडल देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महेश मिलके स्विमिंग ग्रुपने पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले  असल्यामुळे या अकॅडमीचे सर्वेसर्वा व प्रशिक्षक महेश मिलके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 89 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले