तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची – मुख्य अभियंता अनिल डोये , कामगार दिनी महावितरणमध्ये 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल अंतर्गत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. महावितरण मध्ये तांत्रिक कर्मचा-यांची भूमिका अत्यं‍त महत्वाची आहे. त्यांच्या कौशल्य दक्षता आणि तत्परतेमुळेच वीज यंत्रणा प्रभावीपणे चालू राहते, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता अनिल डोये यांनी व्यक्त केले.

या कर्मचाऱ्यांची निवड ही मागील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांनी केलेले प्रशासकीय कामकाज व ग्राहक सेवा या निकषांवर आधारित निवड समितीद्वारे करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 20 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना अनिल डोये पुढे म्हणाले,  कोकणासारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागामध्ये काम करताना महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्राहक व महावितरण यांच्यामधील दुवा म्हणून हे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असून त्यांच्या कार्यामुळे सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचते, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, काम करताना आवश्यक त्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही यासाठी सतर्कता व दक्षता बाळगावी, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

त्याचबरोबर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेले वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करत कोकण परिमंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या भरीव यशामागे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, जबाबदारीची जाणीव आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरली. या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांची दखल घेण्यासाठी लक्ष्यपूर्ती व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरित करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यातही अशीच कार्यतत्परता आणि उत्कृष्टता कायम राखण्याचे आवाहन केले.  सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांसाठी मराठी व हिंदी गीतांचा ‘म्युझिकल मेलोडी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने, सहायक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकनीस, नितीन पळसुलेदेसाई, प्रमोद बाबरेकर, हरी ताम्हणकर, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद कानडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त तांत्रिक कर्मचारी

रत्नागिरी -उत्कृष्ट यंत्रचालक –

मनोज भिवंदे (विभाग रत्नागिरी),  दिपक गायकवाड (विभाग चिपळूण), संदेश भोसले (विभाग खेड),

रत्नागिरी – उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी-

विनित गझने (उपविभाग रत्नागिरी शहर), अमित सावंत (उपविभाग रत्नागिरी ग्रामीण), जयसिंह भातडे (उपविभाग लांजा), कृष्णा डोर्लेकर (उपविभाग  राजापूर – 1), गणेश ठिक (उपविभाग उपविभाग राजापूर – 2), निलेश हांडे (उपविभाग जाकादेवी), संदिप जाधव (उपविभाग देवरुख), गुरुनाथ उंडरे (उपविभाग संगमेश्वर), महेंद्र साळवी (उपविभाग चिपळूण शहर), राजेश महाडीक (उपविभाग सावर्डे), किरण बेंदरकर (उपविभाग गुहागर), बंधू शिगवण (उपविभाग चिपळूण ग्रामीण), संदिप हरेकर (उपविभाग खेड), दिपक लटके (उपविभाग लोटे), कृष्णा टेकाले (उपविभाग मंडणगड), प्रमोद कानसे (उपविभाग दापोली – 1), श्रीपत बुरटे (उपविभाग दापोली – 2)

सिंधुदुर्ग -उत्कृष्ट यंत्रचालक-

दिपक सिंगनाथ (उपविभाग वैभववाडी), भगवान कांबळी (उपविभाग दोडामार्ग),

सिंधुदुर्ग -उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी-

राघोबा राऊळ (उपविभाग कणकवली), रमेश राठोड (उपविभाग आचरा), प्रथमेश पारकर (उपविभाग मालवण), गणेश गोसावी (उपविभाग वैभववाडी), महेश पेडणेकर (उपविभाग देवगड), गोपाळ कुलकर्णी (उपविभाग कुडाळ), निलेश राऊळ (उपविभाग सावंतवाडी), अशोक ठाकरे (उपविभाग ओरोस), वसंत बागायतदार (उपविभाग वेंगुर्ला), अर्जुन सावंत (उपविभाग दोडामार्ग).

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 88 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले