रत्नागिरी : रत्नागिरीच्या ऐतिहासिक भाटये बीच येथे रविवारी, १० मे २०२६ रोजी पार पडलेल्या ८ व्या राज्यस्तरीय स्वीमथॉन स्पर्धेत ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ने दमदार कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप उमटवली. इतर राज्यातून व महाराष्ट्रभरातून आलेल्या जलतरणपटूंमध्ये या ग्रुपने सर्वाधिक ३४ खेळाडू उतरवत विक्रम नोंदवला आणि तब्बल १८ पदके जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली. विजेत्या खेळाडूंना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मंत्री उदय सामंत यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक गटात दमदार यश
स्पर्धेत ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक गटांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये या ग्रुपच्या ४ ते ५ खेळाडूंनी स्थान मिळवले.
सहभागी खेळाडू
ग्रुप 10 (मुले): अधिश जाधव, इझान कापडी, वेदांशु कुबल
ग्रुप 10 (मुली): आराध्या शिंदे, याश्वि जैन, श्रीशा शिंगाडे, इरा भाटवडेकर, साईशा भोपळे, अनाया शिंगाडे
ग्रुप 9 ( महिला): बीना तेंडुलकर
ग्रुप 8: मल्हार सुतवने, श्रीपाद मयेकर, त्रिशा भुजबळराव
ग्रुप 6 (पुरुष): अल्फाराज कापडी, विशाल कुबल
ग्रुप 5 (मुले): करण मिलके, आयुष काळे, योगेंद्र तावडे, श्रीयश विलणकर
ग्रुप 5 (मुली): तनाया मिलके, सानवी पवार, आरोही पिलणकर, संस्कृती जाधव
ग्रुप 4: आयुष कताळे, निधी भिडे
ग्रुप 3 (मुले): शौर्य राऊत
ग्रुप 2: अर्णव पिलणकर, अर्ह भाटकर, सर्वदा लिंगायत
ग्रुप 1 (मुले): रिहान लाड, रिध्देश हरचेकर
महेश मिलिके स्विमिंग ग्रुपची श्रीशा शिंगाडे हीला 500 मिटर स्पर्धेमध्ये सर्वात जलद मुलगी जलतरणपटू म्हणून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे महेश मिलिंग स्विमिंग ग्रुपच्या विशेष (दिव्यांग) मुलांनीही चांगली कामगिरी केली.
या स्पर्धेत कर्नाटक, तेलंगणा, गोवा अशा राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्रातून नागपूर, अमरावती, ठाणे, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्हयातून खेळाडू सहभागी झाले होते.
एकाच स्पर्धेत एकाच प्रशिक्षण केंद्राचे ३४ खेळाडू उतरवण्याची किमया साधत ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ने महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पर्धेतील १८ पदकांची कमाई आणि प्रत्येक वयोगटातील सातत्यपूर्ण यशामुळे हा ग्रुप संपूर्ण स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरला.
प्रशिक्षक महेश मिलके यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुलांचा गौरव होणे ही खेळाडूंसाठी अभिमानाची बाब आहे. नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावरच हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या उल्लेखनीय यशानंतर रत्नागिरी जिल्हाभरातून खेळाडू आणि प्रशिक्षक महेश मिलके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







