चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त ; दुरुस्तीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

रत्नागिरी/मंडणगड, : दि. 9 मे रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या उपविभागांतील विसापूर, मंडणगड आणि कुंबळे या तीन शाखांचा वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या प्रभावित झाल्या आहेत.

चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे 33 केव्ही आणि 11 केव्ही या उच्चदाब वाहिन्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.  उच्चदाब (HT) व लघुदाब (LT) वाहिन्यांचे मिळून 100 हून अधिक वीजखांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तुटल्या असून, काही ठिकाणी त्यांचे कंडक्टर्सही जमिनीवर पडले आहेत.

प्राथमिक अहवालानुसार नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

  • 33 केव्ही मंडणगड : 4 उच्चदाब (HT) खांब व 2 डबल पोल स्ट्रक्चर कोसळले.
  • 33 केव्ही विसापूर : 2 – 3 उच्चदाब (HT) खांब व 6 ते 7 उच्चदाब (HT) खांब झुकले आहेत. तसेच व्ही-क्रॉस आर्म           कोसळली आहे.
  • 33 केव्ही लिंक लाईन : 10 – 12 उच्चदाब (HT)  खांबांचे फॅब्रिकेशन कोसळले असून 3 नग डबल पोल स्ट्रक्चर कोसळले आहे.
  • 11 केव्ही धामणी फीडर : 12 उच्चदाब (HT) खांब कोसळले असून 8 उच्चदाब (HT) खांब झुकले आहेत.
  • 11 केव्ही पालगड फीडर : 23 उच्चदाब (HT) खांब कोसळले असून 9 उच्चदाब (HT) खांब झुकले आहेत.

याशिवाय, तालुक्यातील विविध भागांमध्ये 40 पेक्षा अधिक लघुदाब खांब कोसळले असून अंतर्गत वीजवाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर तत्काळ शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी, वायरमन आणि लाईन स्टाफ यांना विविध भागांत कार्यरत करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त वाहिन्या, खांब व उपकरणांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू असून, आवश्यक साहित्य, अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. “नुकसानीचा आवाका मोठा असून अनेक दुर्गम भागांत वीज यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तरीही वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत.”

ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन

महावितरणने ग्राहकांना या दुरुस्तीच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही हानी अत्यंत मोठी असल्याने अनेक भागात, वाडीत आणि प्रत्येक शेतात विजेचे खांब पडलेले आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व ठिकाणी एकाच वेळी पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्णतः सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी तुटलेल्या किंवा जमिनीवर पडलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच अशा प्रकारची घटना आढळल्यास तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

रत्नागिरी ‍: एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 88 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 36 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले