मिरजोळेत भरदिवसा घरफोडी; ९ तोळे सोने, रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील पाटील वाडी परिसरात हे घर आहे. राजेश बबन भाटकर पत्नीसह कामासाठी बाहेर गेले असताना, घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून चोरटे फरार झाले. घटनेनंतर जेव्हा घरमालक घरी परतले, तेव्हा त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे ९ तोळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, परिसरात कोणा संशयित व्यक्तीची हालचाल दिसली होती का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे मिरजोळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • Related Posts

    रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी व स्पर्धा परीक्षा केंद्राची होणार उभारणी सन २०२५-२६ मधील संपूर्ण ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता साहित्य…

    जिद्दीचे दुसरे नाव श्वेता…

    एखादी गोष्ट ठरवणे आणि प्रत्यक्षात ती उतरवणे यामध्ये प्रचंड अंतर असते. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या एखादी गोष्ट ठरवतात आणि त्याप्रमाणे मेहनतपूर्वक ती प्रत्यक्षात  आणतात. अशीच एक गुणी,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

    • By admin1
    • October 18, 2026
    • 89 views
    रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

    एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

    • By admin1
    • October 9, 2026
    • 37 views
    एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

    अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

    • By admin1
    • October 5, 2026
    • 37 views
    अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

    अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

    • By admin1
    • October 5, 2026
    • 33 views
    अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

    रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

    • By admin1
    • September 28, 2026
    • 47 views
    रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

    प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

    • By admin1
    • September 19, 2026
    • 15 views
    प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले