उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (इ. १० वी) निकाल उद्या, मंगळवार ८…

भान उन्हाळ्यातील आरोग्याचेः स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प!

​     निसर्गाचे चक्र बदलत असताना २०२६ चा उन्हाळा आपल्यासमोर आरोग्याचे एक मोठे आव्हान घेऊन उभा आहे. ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली, तरी घाबरून न जाता…

लोकशाही दिन ; प्रलंबित अर्ज मार्गी लावावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी,  (जिमाका) : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी…

बारावी परीक्षेच्या निकालानंतर समुपदेशन सेवा

  रत्नागिरी  (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर झाला.  निकालानंतर राज्य…

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, : राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा…

तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची – मुख्य अभियंता अनिल डोये , कामगार दिनी महावितरणमध्ये 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल अंतर्गत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता…

विजयदूर्ग येथील सागरी जलतरण स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : विजयदुर्ग येथील खाडीत 9 वी सरखेल कान्होजी आंग्रे खुली जलतरण स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग आयोजित या स्पर्धेचे नियोजन…

पृथ्वीला झालेली ‘अपचना’ची व्याधी: आपल्याच पोटाकडून घेऊया एक धडा – लेखक: विजयकुमार कट्टी

आपल्याला कधी ना कधी तो अनुभव नक्कीच आला असेल—जेव्हा आपण काहीतरी चुकीचे खातो, तेव्हा पोट जड होते, जळजळू लागते आणि अस्वस्थता येते. यालाच आपण ‘अपचन‘ (Indigestion) म्हणतो. अशा वेळी शरीरात नको असलेले वायू (Gases) तयार होतात आणि आपली शक्ती क्षीण होते. आज या वसुंधरा दिनी मला प्रकर्षाने जाणवतेय की, आपली पृथ्वी सुद्धा नेमक्या याच त्रासातून जात आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही केवळ विज्ञानातील आकडेवारी नसून, ती पृथ्वीला झालेल्या ‘तीव्र अपचनाचा‘ परिणाम आहे. १. पचन की कुजणे? आपण काय निवडतोय? निसर्गात ‘पचन’ (विघटन) ही एक पवित्र प्रक्रिया आहे. समजा, एखादे सुके पान मातीत पडले, तर हवा आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने पृथ्वी त्याचे स्वच्छ पचन करते. यातून मातीला पोषक द्रव्ये मिळतात. ही पृथ्वीच्या सुदृढ आरोग्याची निशाणी आहे. पण आज आपण पृथ्वीला ‘कुजायला‘ (Rotting) भाग पाडत आहोत. जेव्हा आपण अन्नाचे तुकडे आणि ओला कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून फेकून देतो, तेव्हा आपण त्या अन्नाचा जसा गळा आवळतो. हवा न मिळाल्याने ते अन्न पचण्याऐवजी कुजू लागते. त्यातून जो ‘मिथेन’ वायू बाहेर पडतो, तो म्हणजे पृथ्वीने दिलेला ‘ढेकर’ आहे. याच वायूमुळे पृथ्वीचा ताप (ग्लोबल वॉर्मिंग) वाढत आहे. २. प्लास्टिकचे ‘कफन‘: श्वास रोखणारा अडथळा जेव्हा आपण ‘सेंद्रिय‘ (ओला कचरा) आणि ‘कृत्रिम‘ (प्लास्टिक, नायलॉन) कचरा एकत्र करतो, तेव्हा प्लास्टिक एका ‘कफन’सारखे काम करते. ते निसर्गाचे मदतनीस—हवा आणि सूर्यप्रकाश—यांना कचऱ्यापर्यंत पोहोचू देत नाही. जरा विचार करा: एखाद्या स्वच्छ बागेत गेल्यावर आपला श्वास आपोआप खोल आणि मोकळा होतो, पण कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळून जाताना आपण नकळत श्वास रोखून धरतो. हे का घडते? कारण आपण ‘प्रकृती–अंश‘ आहोत. आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. जेव्हा आपण पृथ्वीचे पचन सुधारतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपले स्वतःचे मन आणि राहणीमान सुधारत असतो. निसर्गाचे आरोग्य हेच आपले आरोग्य आहे. ३. ‘अनब्लॉक‘ (Unblock) करण्यासाठी आजच उचलण्याची पावले पृथ्वीचे हे अपचन थांबवण्यासाठी आपल्याला खूप मोठे त्याग करण्याची गरज नाही. फक्त आपल्या सवयींमध्ये थोडे बदल हवे आहेत: अन्नाला ‘कफन‘ घालू नका (Don’t Shroud the Food): आजपासून भाजीपाल्याचे देठ, फळांच्या साली प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पिशवीत टाकणे थांबवा. त्याऐवजी स्वयंपाकघरात एक वेगळी टोपली किंवा डबा वापरा ज्यातून हवा खेळती राहील. पृथ्वीसाठी ‘घास‘ बारीक करा (Chew for the Planet): जसे आपण अन्न चावून खातो, तसेच तुमच्या बागेत किंवा खतकुंडीत साचलेला कचरा आठवड्यातून एकदा एका काठीने वर-खाली करा. यामुळे हवा आत शिरते आणि पचन (विघटन) वेगाने होते. ताटातील खडे निवडा (Remove the Stones): आपल्या घरात आजच दोन कचरा कुंड्या ठेवा. एक फक्त ओल्या कचऱ्यासाठी आणि दुसरी प्लास्टिक, वेष्टने यांसारख्या कोरड्या कचऱ्यासाठी. अन्नात प्लास्टिक मिसळणे म्हणजे पृथ्वीला खडे खायला घालण्यासारखे आहे. ४. साचलेला कचरा आणि मनाचे ओझे…

अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या! जिल्हा महिला व बाल विकास अधिका-यांचे आवाहन; नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

रत्नागिरी, (जिमाका):-केंद्र शासनाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 हा संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्यात सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम…

महिला सक्षमीकरणाचा ‘रत्नागिरी पॅटर्न’ प्रभाग समन्वयक धनश्री आंब्रे यांचा यशस्वी उमेद प्रवास

ग्रामीण भागातील महिलांना केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित न ठेवता, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे मोठे कार्य रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथील धनश्री दशरथ आंब्रे करत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत…

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले